सरकारला आता गुप्तता कायद्याच्या आड लपता येणार नाही – राफेल प्रकरणात विरोधकांची टीका

नवी दिल्ली – राफेल प्रकरणात याचिकाकर्त्यांनी समोर आणलेली कागदपत्र सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेण्याचा निर्णय देऊन विरोधकांच्या याचिकेचा विचार करण्याचे ठरवल्याने आता सरकारला गुप्तता कायद्याच्या आड लपता येणार नाहीं अशी प्रतिक्रीया विरोधी पक्षीयांकडून देण्यात आली आहे.

कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पक्षाचे प्रवक्ते सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की मोदी सत्यापासून कितीही दूर पळत असले किंवा खोटे बोलत राहिले तरी कधी ना कधी सत्य बाहेर येणारच आहे. सरकारला आता सरकारी गुप्तता कायद्याचाहीं अधिकार घेता येणार नाहीं. राफेल घोटाळ्याच्या प्रकरणात मोदींनी दडवलेला सांगाडा आता बाहेर आला आहे असे त्यांनी म्हटले आहे.

राफेल प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रकाराला मोदींनी सरकारी गुप्तता कायद्याचा भंग केल्याच्या कायद्यानुसार धमकावण्याचा प्रयत्न केला होता. पण मोदीजी आता तुम्ही अजिबात चिंता करू नका, तुम्हाला आवडो अथवा न आवडो राफेलची चौकशी होणारच आहे असेही सुर्जेवाला यांनी आपल्या ट्‌विटरवर म्हटले आहे.

राफेल प्रकरणात सरकारनेच राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली आहे अशी टीका मार्क्‍सवादी नेते सीतराम येचुरी यांनी केली आहे. त्यांनी राफेल प्रकरणात कॅग पासूनही खरेदी किंमत लपवली असून त्यांनी जेपीसी चौकशी पासून पळ काढून आपली जबाबदारीही टाळली आहे. सुरवातीला त्यांनी न्यायालयाची दिशाभुल करून तेथील या प्रकरणाची चौकशीही थांबवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला क्‍लीन चीट दिली असल्याचा मोदींचा दावा उघडा पडला असून राफेल प्रकरणातील जी एकामागून एक कागदपत्रे बाहेर आली आहेत ती पाहिल्यानंतर मोदीचे सरकार हे देशाच्या इतिसहासातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे उघड झाले आहे असे त्यांहनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.