पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका करताना जीभ पुन्हा घसरली; म्हणाले, ‘सुप्रिया सुळे यांचं…’

Updated On:

बारामती – 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघात भाजपा रणनीती आखत असून त्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे दोन दिवसीय बारामती दौऱ्यावर आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहूल कुल, आमदार गोपिचंद पडळकर, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, दिलीप खैरे, पांडूरंग कचरे, सतीश फाळके आदींची उपस्थिती होती.

‘देशात अनेक गड उध्वस्त झाले आहेत. गड कोणाच्या एकाच्या मालकीचा राहत नाही हा देशाचा इतिहास आहे. पवारांचा गड 2024 ला भाजपाने जिंकलेला दिसेल. अशी गर्जना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात केली आहे.

तर यावेळी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची खासदार सुप्रिया सुळेंवर टीका करताना जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. ‘बारामतीत २०२४ साली परिवर्तन होईल. भाजपाचा २०२४ ला येथे गुलाल उधळणार आहे. राहुल गांधींसारख्या केंद्रीय नेतृत्वाचा पराभव होऊ शकतो. तुमचा पक्ष तर काँग्रेस एवढा देशभर पसरलेला नाहीये. काही मोजक्या जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम चालते. अति आत्मविश्वास चांगला नाही.’

ते पुढे म्हणाले,’निर्मला सीतारमण यांचा दौरा निश्चित झाल्यापासून सुप्रिया सुळे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. भाजपाकडून मतदारसंघात बांधणी सुरू आहे. त्यामुळे बारामती लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जायचं कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होणार आहे,” अशी टिपणी गोपीचंद पडळकर यांनी केल्याने वाढ वाढण्याची चिन्ह आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

2026-10-07 19:26:25

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

2026-10-07 19:06:35

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

West Bengal : पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' होणार; 'या' नेत्याची मोठी घोषणा

2026-10-07 17:37:34

West Bengal : पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' होणार; 'या' नेत्याची मोठी घोषणा

Nitin Nabin : नरेंद्र मोदी हे जनतेने थेट निवडलेले पहिले पंतप्रधान; नितीन नविन यांच्याकडून मोदींचे कौतुक

2026-10-07 16:58:14

Nitin Nabin : नरेंद्र मोदी हे जनतेने थेट निवडलेले पहिले पंतप्रधान; नितीन नविन यांच्याकडून मोदींचे कौतुक