सांगली लोकसभा : गोपीचंद पडळकरांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी

सांगली -वंचित बहुजन आघाडीतर्फे सांगली लोकसभेसाठी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. धनगर समाजाचे नेते जयसिंग शेंडगे आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा पत्रकार परिषद घेत आज केली आहे.

गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीमुळे सांगलीत भाजपाचे संजयकाका पाटील, स्वाभिमानीचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी आणि लक्षवेधी लढत होणार आहे.

दरम्यान, गोपीचंद पडळकर हे सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते. वंचित बहुजन आघाडीने सांगलीत आधीच आपला उमेदवार जाहीर केला होता. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी अपक्ष लढण्याची भूमिका जाहीर केली होती. तसेच सांगलीतील विरोधी पक्षांचे उमेदवार पाहता, वंचित बहुजन आघाडीने उमेदवार बदलण्याची तयारी केली होती. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेत उमेदवार बदलण्याचं निश्चित केलं होतं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.