Gopichand Padalkar : भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. विशाल पाटील खासदार व्हावेत अशी जयंत पाटलांची इच्छा होती का हे त्यांनी आईची शपथ घेऊन सांगावे, असे थेट आव्हानचं पडळकर यांनी जयंत पाटील यांना दिले आहे. विशाल पाटील हे 2029 मध्ये सुद्धा खासदार होणार या जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून समाचार घेण्यात आला. “जयंत पाटलांनी त्यांच्या मुलासाठी प्रयत्न केला होता, हे तुम्हाला माहीत आहे ना? जर ते विशाल पाटलाला खासदार करू शकत असतील तर त्यांनी त्यांच्या मुलाला केला असतं ना? सगळ्या पोरांचं लॉन्चिंग झालं आहे. आर आर पाटलांचा मुलगा आमदार झाला, अजितदादा पवारांचा मुलगा खासदार झाला. मात्र अजून जयंतरावांच्या मुलांचे काही होत नाही, याची त्यांना चिंता आहे.” Gopichand Padalkar Devendra Fadnavis : “…तर आपल्यालाही अडचणीचा सामना करावा लागेल”; पंतप्रधानांच्या वर्क फ्रॉम होम, इंधन संकटावरील आवाहनानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया Jayant Patil ‘जयंत पाटलांनी लोकसभेला हातकणंगले, सांगलीतून त्यांच्या मुलासाठी प्रयत्न केले’ “मागच्या वेळी जयंत पाटलांनी लोकसभेला हातकणंगले मतदारसंघातून त्यांच्या मुलासाठी प्रयत्न केले होते, सांगलीतून सुद्धा प्रयत्न केले होते, अगदी भाजपमधून तो उभा राहणार अशा बातम्या सुद्धा पेरून त्यांनी चाचपणी केली होती. त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत केवळ १० हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यांचं त्यांना पडलं. विशालला आता ते पुन्हा खासदार करायला निघालेत, विशाल पाटील खासदार व्हावं जयंत रावांची इच्छा आहे का? जयंतरावने आईची शपथ घेऊन सांगावं की विशाल पाटील खासदार व्हावं असे वाटत होतं का?, अशी जोरदार टीका गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांच्यावर केली. हेही वाचा : Yerwada Prisoner Escaped : येरवडा कारागृहातून जन्मठेपेचा कैदी फरार! ‘जेवण आणतो’ असे सांगून जवानांच्या डोळ्यादेखत झाला पसार