‘भारताची गुन्हेगारीची राजधानी’ ; गोपाळ खेमका हत्या प्रकरणावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

Gopal Khemka Murder Case। पाटण्यात दिवसाढवळ्या उद्योगपती गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “या हत्येमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की भाजप आणि नितीश कुमार यांनी मिळून बिहारला ‘भारताची गुन्हेगारीची राजधानी’ बनवले आहे.”
आता एका नवीन बिहारची वेळ आली Gopal Khemka Murder Case।
राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये , आज बिहार लूट, गोळ्या आणि खूनाच्या सावलीत जगत आहे. येथे गुन्हेगारी ‘नवीन नॉर्मल’ बनली आहे आणि सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बिहारच्या बंधू आणि भगिनींनो, हा अन्याय आता सहन केला जाऊ शकत नाही, जे सरकार तुमच्या मुलांचे रक्षण करू शकत नाही, ते तुमच्या भविष्याची जबाबदारीही घेऊ शकत नाही. प्रत्येक खून, प्रत्येक लूट, प्रत्येक गोळी – ही बदलाची हाक आहे. आता एका नवीन बिहारची वेळ आली आहे – जिथे प्रगती असेल, भीती नाही. यावेळी मतदान फक्त सरकार बदलण्यासाठी नाही तर बिहार वाचवण्यासाठी आहे.” असे म्हटले आहे.
पटना में व्यवसायी गोपाल खेमका की सरेआम गोली मारकर हत्या ने एक बार फिर साबित कर दिया है – भाजपा और नीतीश कुमार ने मिलकर बिहार को “भारत की क्राइम कैपिटल” बना दिया है।
आज बिहार लूट, गोली और हत्या के साए में जी रहा है। अपराध यहां ‘नया नॉर्मल’ बन चुका है – और सरकार पूरी तरह नाकाम।…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 6, 2025
गोपाल खेमका यांची हत्या कधी झाली? Gopal Khemka Murder Case।
बिहारचे प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची पाटण्यातील त्यांच्या घराजवळ दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी रात्री ११.४० वाजता गांधी मैदान परिसरात घडली.
पोलीस अधीक्षक (पाटणा मध्य) दीक्षा यांनी पत्रकारांना सांगितले की, “स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गस्ती वाहनांमधील पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक तज्ञ पुरावे गोळा करत आहेत. तपास सुरू आहे. ते म्हणाले, “सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की खेमका यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने गोळी झाडली होती.





