पिंपरी | कामशेत येथे विद्यार्थीनींना ‘गुड टच बॅड टच’चे धडे

कामशेत, (वार्ताहर) – रोटरी क्लब ऑफ मावळ आणि कामशेत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत येथील इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींसाठी गुड टच आणि बॅट टच विषयी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.
बदलापूर अत्याचार घटनेमुळे पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून मुलींमध्ये लैंगिक शोषणाबाबत जागरूकता व्हावी या उद्देशाने सोमवारी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी कामशेतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, धनंजय वाडेकर, मुख्याध्यापिका अनिता देवरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन घोटकुले, रेश्मा फडतरे, ॲड. दीपक चव्हाण व सदस्य, कामशेत पोलीस स्टेशनचे गणेश तावरे, महिला पोलीस दिपाली शिंदे, निशा लालगुडे आणि सुमारे ३०० विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना क्लबच्या उपाध्यक्षा रेश्मा फडतरे म्हणाल्या की, मुलींना गुड टच- बॅड टच याबाबत आई किंवा घरातील महिलांनी पूर्ण जाणीव करून द्यावी. मुलींना घडणाऱ्या अत्याचार व लैंगिक शोषणापासून जागृत करावे.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ म्हणाले, पालकांनी मुलींबरोबर संवाद साधून समाजात वावरताना चांगल्या गोष्टी व वाईट गोष्टी याची जाणीव करून द्यावी.
तसेच काही चुकीच्या घटना आपल्या निदर्शनास आल्यास त्वरित कोणालाही न घाबरता जवळच्या पोलीस ठाण्याला आपल्या मदतीसाठी कळवावे.





