Madhya Pradesh : भाजप आमदाराचा जावईशोध! म्हणाले, “चांगल्या रस्त्यांमुळे होतात सर्वाधिक अपघात”

भोपाळ – चांगल्या रस्त्यांमुळे सध्या सर्वाधिक अपघात होत आहेत. चांगल्या रस्त्यांमुळे वाहने वेगाने जातात. वेगाने जाणारे वाहन कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, असा जावईशोध मध्य प्रदेशातील खंडवा येथील मंधाता विधानसभेचे भाजप आमदार नारायण पटेल यांनी लावला आहे.
खरं तर, मध्य प्रदेशातील इंदोर वगळता सर्वत्र रस्त्यांची अवस्था सध्या वाईट आहे. त्यामुळे दररोज अपघात होत आहेत. एक जानेवारीपासून एकट्या खांडव्यात चार मोठे बस अपघात झाले आहेत. असे असतानाही भाजप आमदाराचा हा युक्तिवाद समजण्या पलीकडचा आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अमेरिकेत गेले आणि त्यांनी सांगितले की, मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांपेक्षा चांगले आहेत. त्यानंतर रस्त्यांबाबत बराच गदारोळही झाला होता.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/who-is-shah-rukh-khan-assam-cm-himanta-sarma-amid-pathaan-controversy/
मात्र आता राज्यातील भाजप सरकारमधीलच आमदार नारायण पटेल म्हणतात की, चांगल्या रस्त्यांमुळे लोक जास्त वेगाने वाहने चालवतात आणि वेगाने जाणारे वाहन अनियंत्रित होते आणि अपघात होतात. म्हणजेच देशातील चांगले रस्ते हे रस्ते अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

