कांद्याला चांगला भाव, पण व्यापाऱ्यांनाच अधिक वाव

– कल्पेश भोई

चाकण – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील उपबाजाराते गेल्या चार ते पाच आठवड्यांपासून कांद्याने चांगलाच भाव खाल्ला असून प्रति क्विंटलला कांद्याचे भाव 24 हजार 500 ते 25 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात कांदा प्रतवारीनुसार 30 ते 35 रुपये किलोपर्यंत विक्री होत असल्याने नेहमी शेतकऱ्यांना रडविणाऱ्या कांद्याने आता आपला रडविण्याचा गुणधर्म पुन्हा एकदा सामान्य नागरिकांना दाखविला आहे. या दरवाढीचा फायदा मात्र, सामान्य शेतकऱ्यांना होत नाही. हीच वस्तुस्थिती असून “कांद्याला चांगला भाव, पण व्यापाऱ्यांनाच अधिक वाव’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर कांदा चाळींच्या अभावाने सामान्य शेतकऱ्यांना कांद्याची साठवणूक जमत नाही.

या महत्त्वाच्या बातम्या वाचलात का?

उत्तर पुणे जिल्ह्यातील चाकण हे कांदा उत्पादनाचे आगार असल्यामुळे जून ते सप्टेंबर वगळता संपूर्ण आठ महिने ताजा कांदाच बाजारात उपलब्ध असतो. मात्र, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये साठवण केलेल्या कांद्याची आवक होत असल्याने लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. दरम्यान, हंगामात आलेला कांदा व्यापाऱ्यांचा चाळीत बंद होतो आणि जून ते सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांकडील कांदा संपताच कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते, आणि कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ सुरू होते. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यां नव्हे तर व्यापाऱ्यांना होतो, व्यापारी, निर्यातदार मंडळींचे “खिसे फुगतात’ आणि गगनाला भिडलेल्या कांद्याच्या भावाने रातोरात व्यापारी “गब्बर’ झाले आहेत. डिसेंबर 2018मध्ये 300, तर आजच्या बाजारात 2500 रुपये क्विंटल दराने विक्री झाली.

भाव आणखी गगनला भिडण्याची चिन्हे
यावर्षी सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे अद्यापही बहुतांश भागात कांदा लागवड करता आलेली नाही त्यामुळे “दुष्काळात तेरावा’ अशी स्थिती निर्माण झाली असून सालाबादप्रमाणे ऑक्‍टोबर-नोव्हेंबरदरम्यान बाजारात येणारा पावसाळी कांदा डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरम्यान, ऑगस्टनंतर कांदा उत्पादन करणारी महाष्ट्रातील नाशिक व लासलगाव या भरवशाच्या क्षेत्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेश भागातून नवीन कांदा उत्पादन येईपर्यंत या साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्यावरच गुजराण करावी लागणार असल्याने कांद्याचे भाव आणखी गगनाला भिडण्याची चिन्हे गडद
झाली आहेत.

खेड तालुक्‍यात 650 कांदा चाळी
खेड तालुक्‍यात सुमारे 650 कांदा चाळी आहेत. त्यातील वैयक्तिक कांदा चाळींची संख्याच लक्षणीय आहे. मागील वर्षी रब्बी हंगामात खेड तालुक्‍यातील 4 हजार 250 हेक्‍टर क्षेत्रात कांदा लागवड करण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.