Ganesh festival 2025 – राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणेतच एसटी कर्मचाऱ्यांना देखील गणेशोत्सवानिमित्त २६ ऑगस्टला पगार दिला जाणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य शासनाकडून जुलै महिन्याच्या सवलतमूल्यापोटी प्रतिपूर्ती म्हणून ४७७ कोटी रुपयांचा निधी वर्ग करणारा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार मंगळवारी होणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात 7 ते 10 तारखेपर्यंत पगार दिला जातो. मात्र, या महिन्यात खास बाप्पासाठी परिवहन मंत्रांनी लवकर पगार करण्याचे दिले आदेश दिले आहेत.