महाराष्ट्रात पर्यटनाला चांगले दिवस : विजय देशमुख

Updated On:

हडपसर – पुणे जिल्हा आणि शहरात शेकडो पर्यटन स्थळे आहेत. याशिवाय महाराष्ट्रातही अनेक पर्यटन स्थळे आहेत.तेथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे.आपल्यातूनही त्या-त्या क्षेत्रातील आवड असलेल्यांनी यासाठी पुढे यावे .महाराष्ट्रात पर्यटनाला चांगले दिवस आहेत. असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा पर्यटन विकास समिती अध्यक्ष विजय देशमुख यांनी केले.

हडपसर अमनोरा येथे एका कार्यक्रमात टुरिझम फोरम ऑफ महाराष्ट्र या सहकारी संस्थेचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे, MTDC चे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे ,उपसंचालक महाराष्ट्र पर्यटन सुप्रिया दातार ,ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सूनंदन लेले,सुप्रिया करमरकर, संस्थेचे अध्यक्ष राजेश आरगे, मनोज मेनन , पांडुरंग तावरे ,संस्थेचे संस्थापक सदस्य वैष्णवी वाटवे, प्रियांक रांका, सागर शिंदे, आणि अरुणाब सिन्हा हे उपस्थित होते.

महाराष्ट्र पर्यटनाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी जागतिक आणि भारतीय स्तरावर प्रयत्न करणे. महाराष्ट्राला भारतातील अग्रगण्य पर्यटन राज्य बनविण्यासाठी प्रयत्न करणे. या उद्देशाने पर्यटन व्यवसायातील हॉटेल, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट या व्यावसायिकांनी एकत्र येत या संस्थेची स्थापना केली आहे. असे अध्यक्ष राजेश आरगे यांनी सांगितले. सूत्रसंचालन संस्थेचे सदस्य सारंग भिडे यांनी केले. संस्थेचे सचिव कृष्णा गोपालन यांनी आभार मानले.

आणखी संबंधित बातम्या

Panshet Drowning : मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची! पानशेत धरणाच्या कॅनॉलमध्ये बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत

2026-05-26 05:00:18

Panshet Drowning : मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची! पानशेत धरणाच्या कॅनॉलमध्ये बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत

Vande Bharat Train : जम्मू-श्रीनगर रेल्वे सेवा 'या' दिवशी होणार सुरू; 'वंदे भारत'ने काश्मीरचे स्वप्न साकार!

2026-04-25 16:10:07

Vande Bharat Train : जम्मू-श्रीनगर रेल्वे सेवा 'या' दिवशी होणार सुरू; 'वंदे भारत'ने काश्मीरचे स्वप्न साकार!

Satara News : महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यावर भर - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

2026-04-15 21:44:27

Satara News : महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यावर भर - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Mahabaleshwar : एकनाथ शिंदेंची 'ही' संकल्पना अजित सपकाळ कशी पूर्ण करणार? वाचा सविस्तर

2026-02-19 00:15:35

Mahabaleshwar : एकनाथ शिंदेंची 'ही' संकल्पना अजित सपकाळ कशी पूर्ण करणार? वाचा सविस्तर

पर्यटन क्षेत्रात 9.1 कोटी नवीन नोकऱ्या; फ्यूचर ऑफ द ट्रॅव्हल अँड टुरिझम वर्कफोर्सचा अहवाल समोर

2025-10-05 15:42:24

पर्यटन क्षेत्रात 9.1 कोटी नवीन नोकऱ्या; फ्यूचर ऑफ द ट्रॅव्हल अँड टुरिझम वर्कफोर्सचा अहवाल समोर