Gold-Silver: चांदीचा दर एका दिवसात 8,500 रुपयांनी उसळला; सोनं 600 रुपयांनी स्वस्त; आजचे भाव जाणून घ्या…
Updated On:

Gold-Silver: शुक्रवारी चांदीचा दर एकाच दिवसात 8 हजार 500 रुपयांनी वाढून 1 लाख 71 हजार रुपये प्रति किलो झाला. गेल्या तीन सत्रात चांदीचा दर 17 हजार 500 रुपयांनी वाढला आहे.
सोन्याचा दर अगोदरच उच्च पातळीवर असल्यामुळे शुक्रवारी सोन्याचा दर 600 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 26 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. विश्लेषकांनी सांगितले की, अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावत असल्यामुळे आगामी काळात अमेरिका आक्रमक व्याजदर कपात करण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत डॉलरचे मूल्य कमी होणार आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होणार असल्यामुळे गुंतवणूकदार सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करीत राहण्याची शक्यता आहे. सध्या दागिन्याऐवजी गुंतवणुकीच्या सोन्याची जास्त खरेदी होत असल्याचे हे नमूद करण्यात आले.





