Gold-Silver Rates Today: सोने अल्प प्रमाणात वाढले; चांदी घसरली
Updated On:

मुंबई – जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे भारतीय सराफात सोन्याच्या दरात मंगळवारी वाढ नोंदली गेली. सोन्याचा दर 144 रुपयांनी वाढून 48,167 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा दर मात्र 76 रुपयांनी कमी होऊन 61,607 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,819 डॉलर व चांदीचा दर 22.85 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. त्यामुळे भारतीय सराफातही सान्याच्या दरात सोमवारी वाढ नोंदली गेली. अमेरिका लवकरच व्याजदरात वाढ करणार असल्यामुळे विविध बाजारांमध्ये काही प्रमाणात अस्थिरता रेंगाळत असल्याचे त्यांनी सांगितले.





