Gold-Silver Rates Today: सोने 51,469 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 55,550 रु. प्रति किलो
Updated On:

नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात मंगळवारी सोन्याचा भाव 66 रुपयांनी कमी होऊन 51,469 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर चार रुपयांनी वाढून 55, 550 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,736 डॉलर व चांदीचा दर 18.81 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.
सोने, चांदी, चलन आणि शेअर बाजारात सध्या कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. वायदे बाजारामध्ये सोन्याचे दर वाढले असूनही स्पॉट मार्केटमध्ये मात्र सोन्याचे दर कमी झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
अमेरिकेने व्याजदर वाढ करण्याची घोषणा केल्यामुळे आगामी काळामध्ये विविध बाजारामध्ये अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे पतधोरण सप्टेंबर महिन्यात जाहीर होणार आहे. (Gold-Silver Rates Today)



