Gold-Silver Rates : सोने व चांदीच्या दरात मोठी वाढ
Gold-Silver Rates : अमेरीकेत मवाळ पतधोणाच्या शक्यतेचा परिणाम

Gold-Silver Rates : आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि कमजोर अमेरिकन डॉलरमुळे मागणी वाढल्याने, राष्ट्रीय राजधानीत गुरुवारी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव बुधवारच्या 1,44,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या बंद भावावरून 3,000 रुपयांनी वाढून 1,47,500 रुपये प्रति 10 ग्रॅम (सर्व करांसहित) झाला.
चांदीच्या दरात सलग तिसर्या सत्रात तेजी कायम राहिली असून, तो 5,000 रुपयांनी वाढून 2,40,000 रुपये प्रति किलोग्राम (सर्व करांसहित) झाला. मागील सत्रात चांदीचा भाव 2,35,000 रुपये प्रति किलोग्रामवर स्थिरावला होता.
परदेशी बाजारांमधील तेजीमुळे दोन सत्रांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात सुधारणा झाली, तर औद्योगिक आणि गुंतवणुकीच्या मागणीत सातत्य राहिल्याने चांदीच्या दरात वाढ सुरूच राहिली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीज विभागाचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांनी कमी कठोर भूमिका घेतल्याने सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली.
जागतिक स्तरावर, स्पॉट गोल्ड 38.75 डॉलर्सने, म्हणजेच 1 टक्क्याने वाढून प्रति औंस 4,070.04 डॉलर्सवर पोहोचले आणि चांदी 1.3 टक्क्यांनी वाढून प्रति औंस 59.89 डॉलर्सवर पोहोचली.
मिराए असेट शेअरखानचे कमोडिटीज विभागाचे प्रमुख प्रवीण सिंग म्हणाले, बँक ऑफ जपानच्या हस्तक्षेपाच्या वृत्तांनंतर जपानी येनच्या मजबुतीमुळे डॉलर कमकुवत झाल्याचे सिंग यांनी सांगितले. कमकुवत डॉलरमुळे इतर चलनांमध्ये व्यवहार करणार्यांसाठी सोने स्वस्त होते, ज्यामुळे जागतिक मागणी वाढते आणि किमतींना आधार मिळतो, असे ते पुढे म्हणाले.



