Gold-Silver Rates: आज पुन्हा सोने-चांदीच्या दरात घट, जाणून घ्या लेटेस्ट दर
Updated On:

नवी दिल्ली – दिल्ली सराफात शुक्रवारी सोन्याचा दर 301 रुपयानी कमी होऊन 46,415 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 402 रुपयांनी कमी होऊन 59,044 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,789 डॉलर व चांदीचा दर 22.08 डॉलर या पातळीवर गेला.
अमेरिकेची रिझर्व बॅंक असलेल्या फेडरल रिझर्व्हने लवकर व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. अमेरीकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे सोन्याच्या किमतीत घट झाली असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. ते म्हणाले की, महागाई वाढत असल्यामुळे अमेरिकेचे फेडरल रिझर्व अपेक्षेपेक्षा लवकर व्याजदर वाढ करील असे गृहीत धरले जाऊ लागले आहे.





