नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्यानंतर भारतीय बाजारातही गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात वाढ नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 177 रुपयांनी वाढून 47,443 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर गेला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 83 रुपयांनी वाढून 68,277 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतीक बाजारात सोन्याचा वर वाढून 1,831 डॉलर तर चांदीचा दर 26.30 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. जागतिक चलन बाजारात इतर चलनाच्या तुलनेत डॉलरचा दर घसरत असल्यामुळे सोन्याचे आकर्षण वाढले असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. आगामी काळात जर महागाई वाढली तर सोन्यामध्ये गुंतवणूक वाढून सोन्याचा दर वाढू शकतो असे त्यांनी सुचित केले.