नवी दिल्ली – रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर सोने आणि चांदीचे दर वेगाने वाढले होते. मात्र आता युद्ध मंदावण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या दराने वेगाने घट होत आहे.
जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर कोसळल्यानंतर भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घट नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर गुरुवारी 992 रुपयांनी कमी होऊन 52,635 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. त्याचबरोबर चांदीचा दर 1,949 रुपयांनी कोसळून 69,458 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
युद्ध मंदावण्याच्या शक्यतेमुळे आणि उत्तर प्रदेशात भाजपा जिंकल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. त्याचा परिणाम रुपयाचे मूल्य वधारण्यात झाला. याचाही परिणाम सोन्याच्या दरावर झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जागतिक बाजारात सोन्याचा दर 2 हजार डॉलरच्या पुढे गेला होता. आज सोन्याचा दर 1,963 डॉलर व चांदीचा दर 25.20 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.