नवी दिल्ली – एचडीएफसी सिक्युरिटीजने जारी केलेल्या माहीतीनुसार मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याचा भाव 128 रुपयांनी वाढून 57,275 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा भाव मात्र 38 रुपयांनी घसरून 67,975 रुपये किलो झाला.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, परदेशात सोन्याचा भाव प्रति औंस 1,874 डॉलर तर चांदीचा भाव 22.42 डॉलर प्रति औंस होता. आशियाई कॉमेक्समध्ये सोन्याच्या किमती वाढल्या होत्या. या आठवड्यात आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होत आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.