Gold-Silver Rate:सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ ; वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा भाव काय ?
Gold-Silver Rate: आज देशभरात सोने आणि चांदीच्या किमतीत कालपेक्षा आज वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे.

Gold-Silver Rate: आज देशभरात सोने आणि चांदीच्या किमतीत कालपेक्षा आज वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोने-चांदीच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. कालचे २४ कॅरेट सोन्याचे दर हे १५,६०६ होते. मात्र आज यात १५८ रुपयांनी वाढ झाली आहे.
आजचा सोन्याचा दर काय?
आज देशात २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १५,७६४ रुपये आहे. यात १५८ रुपयांनी वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा १४,४५० रुपये असून यामध्ये १४५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ११, ८२३ रुपये असून यामध्ये ११९ रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
शहरानुसार सोन्याचा भाव
दिल्ली – १,५६,२००
मुंबई – १,५६,०५०
कोलकाता – १,५६,०५०
चेन्नई – १,५८,१७०
चांदीचा आजचा भाव
चांदीच्या भावातही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. १ ग्रॅम चांदीची किंमत २८० रुपये आहे. ८ ग्रॅम चांदीची किंमत २,२४० रुपये आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ही २,८०० रुपये आहे. तर १००० ग्रॅम चांदीची किंमत ही २,८०,००० रुपये इतकी आहे.






