Gold – Silver Rate Today: अक्षय्य तृतीयेला चांदी 4000 रुपयांनी कोसळली, सोन्यातही मोठी घसरण

Gold – Silver Rate Today: अक्षय्य तृतीया या शुभ मुहूर्तावर सोने-चांदीच्या खरेदीसाठी बाजारात उत्साह असताना, दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत 900 रुपयांची मोठी घसरण झाली. 99.9 टक्के शुद्धतेचे सोने 99,450 वरून 98,550 रुपये प्रति 10 ग्रामवर आले, तर 99.5 टक्के शुद्धतेचे सोने 98,100 रुपये प्रति 10 ग्रामवर घसरले.
चांदीच्या किमतीतही 4,000 रुपयांची घसरण होऊन ती 1,02,000 वरून 98,000 रुपये प्रति किलोवर आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोर संकेत आणि अमेरिकन धोरणांचा प्रभाव यामुळे ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अक्षय्य तृतीयेला गेल्या वर्षी सोने 72,300 रुपये प्रति 10 ग्राम होते, तर यंदा 98,550 रुपये आहे. दरम्यान, यंदा देशभरात अक्षय्य तृतीयाला 20 सोन्याची विक्री झाली.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रभाव –
ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 43.35 डॉलर (1.31%) घसरून 3,273.90 डॉलर प्रति औंसवर, तर चांदी 1.83% घसरून 32.33 डॉलर प्रति औंसवर आली.





