Gold – Silver Rate | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी बजेट सादर केल्यानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आजही सोन्या-चांदीच्या किमतीत थोडा बदल दिसून आला. सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली असून, चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने ६३,४१० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ६३,४१० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. मागील दोन आठवड्यापासून चांदीने दरवाढीला ब्रेक लावला आहे. बजेटनंतर चांदी ७००० रूपयांनी स्वस्त झाली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव ८५,००० रुपये आहे. मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६३,४१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ६८,५८९ प्रति १० ग्रॅम आहे. पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६३,४१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ६८,५८९रुपये आहे. नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६३,४१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ६८,५८९रुपये इतका आहे. घसरणीनंतर पुन्हा सोने-चांदीच्या दरात वाढ दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील सीमाशुल्कात कपात करण्याची घोषणा केली. यानंतर काही वेळातच सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे. हेही वाचा: शेअर बाजाराची सुरुवात संथ ; सेन्सेक्स-निफ्टी सपाट उघडले पण मिडकॅप-स्मॉलकॅप वधारले