Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर

Gold-Silver Rate: आज 19 फेबुवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे. एकीकडे सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली असताना चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 62,670 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 76, 000 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला. गोल्ड रिटर्न्सनुसार ही माहिती देण्यात आली आहे.
मुंबई-
मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 57,450 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,670 प्रति 10 ग्रॅम आहे.
पुणे –
पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 57,450 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 62,670 रुपये असेल.
नागपूर –
नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 57,450 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 62,670 रुपये इतका असेल.
नाशिक-
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,450 आहे तर प्रति १० ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 62,670 रुपये आहे.
दरम्यान, सोने- चांदीच्या भावात सतत चढ -उतार होत असल्याचे पाहायला मिळते. देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चमक कायम आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे भाव वाढत आहेत. यातच आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.





