Gold -Silver Rate । ऐन दिवाळीत भारतात सोने आणि चांदीच्या दर वाढले आहे. दिवाळीत ग्राहकांकडून सोने चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते अशात आता सोने चांदीचा दराने नवा उच्चांक गाठला आहे. जाणून घेऊया आजचा लेटेस्ट दर… चांदीचा प्रतिकिलो दर एक लाखाच्या जवळपास पोहोचला आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 558 रुपयांनी वाढून 77 हजार 968 रुपये तोळा झाला आहे, तर चांदी प्रतिकिलो 4884 रुपयांनी वधारून 97 हजार 167 रुपयांवर पोहोचली आहे. वर्षभरात सोने प्रति 10 ग्रॅमसाठी 15 हजार रुपयांनी महाग झाले, तर चांदी 23 हजारांनी वाढली आहे. gold and silver price today । सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल. gold and silver price today । हॉलमार्ककडे लक्ष द्या सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.