नवी दिल्ली -जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढले. त्या प्रमाणात भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 110 रुपयांनी वाढून 46,396 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 324 रुपयांनी वाढून 66,864 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,783 डॉलर तर चांदीचा दर 25.94 डॉलर प्रति किलो या पातळीवर गेला.
सध्या जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत आगामी काळातही अशीच परिस्थिती असेल, असे एचडीएफसी सिक्युरिटी विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.