Gold Silver Rate Today: आज सोनं झालं महाग, चांदीच्या दरातही उसळी
Updated On:

एमसीएक्स वर 24 कॅरेट सोन्याची किंमत गुरुवारी वाढली आहे. आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.48 टक्क्यांनी वाढला आहे. या वाढीसह सोन्याचा भाव 48 हजार 317 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.
यासोबतच आज चांदीची चमकही वाढली आहे. चांदीच्या किंमतीत 1.86 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या तेजीनंतर चांदीने पुन्हा एकदा 61 हजारांचा आकडा गाठला आहे. आज चांदीची किंमत 61 हजार 326 रुपये प्रति किलो झाली आहे.
दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या दागिन्यांची किंमत देशभर बदलते. यासाठी तुम्ही तुमच्या शहरातील सोन्याची किंमत मोबाईलवर देखील पाहू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सोने-चांदीचे दर तपासू शकता.





