नवी दिल्ली – गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात एकतर्फी घट होत होती. मात्र शुक्रवारी सोन्याचे दर स्थिर राहिले. चांदीच्या दरात मात्र शुक्रवारी घट नोंदणी गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर केवळ दोन रुपयांनी वाढून 46,171 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मात्र तयार चांदीचा दर 209 रुपयानी कमी होऊन 62,258 रुपये प्रति किलो झाला.
आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे बरीच गुंतवणूक शेअर बाजाराकडे वळू लागली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये घट होत असल्याचे दिसून येत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
शुक्रवारी जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,813 डॉलर तर चांदीचा दर 24 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. भारतीय बाजारात सध्या सोन्याचे दर कमी आहेत. त्याचबरोबर आगामी काळामध्ये उत्सव येत आहेत. त्यामुळे सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.