नवी दिल्ली – युद्धाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होत आहेत. भारतीय बाजारातही सोमवारी सोन्याचा दर 362 रुपयांनी कमी होऊ 52,443 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 612 रुपयांनी कमी होऊन 69,665 रुपये प्रत्येक किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,970 डॉलर व चांदीचा दर 25.58 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. अमेरिकेच्या कर्ज रोख्यावरील परतावा कमी झाला आहे. यामुळेही सोन्याच्या दरामध्ये जागतिक पातळीवर घट झाली असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानि यांनी सांगितले.