नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी झाला असला तरी भारतीय बाजारात मात्र सोन्याचा दर बुधवारी वाढला. दिल्ली सराफात सोन्याचा दर एक हजार रुपयांनी वाढून 1 लाख 750 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. तयार चांदीचा दर दिल्ली सराफात 440 रुपयांनी वाढवून 98,940 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. अमेरिका- चीन व्यापार करार बोलणी होण्याची शक्यता असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचा दर 62 डॉलरने कमी होऊन 3,369 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा दर 1.24 टक्क्यांनी कमी होऊन 32.81 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. अमेरिकेचे पतधोरण बुधवारी रात्री उशिरा जाहीर होणार आहेत. या पतधोरणात व्याजदर कपात होण्याची शक्यता नसल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर अस्थीर होते.