नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात गुरुवारी सोन्याचा दर 455 रुपयांनी वाढून 46,987 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 894 रुपयांनी वाढून 61,926 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक पातळीवर काही गुंतवणूक सोन्याकडे वळत असल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. जागतीक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,795 डॉलर तर चांदीचा दर 23.20 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची शक्यता त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतामध्ये आगामी काळात बरेच जण येणार आहेत. त्यामुळे भारतात सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता आहे. या काळात खरेदी करणे शुभ मानले जाते.