Gold Rates: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव फेटाळल्यामुळकच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. सोमवारी राजधानीत सोन्याचा भाव 600 रुपयांनी घसरून 1,55,300 रुपये रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरासाठी अनावश्यक सोन्याची खरेदी पुढे ढकलण्याचे आवाहन केल्यामुळे अतिरिक्त दबाव आला. अमेरिका-इराण वाटाघाटींमधील ताज्या अडथळ्यांमुळे सोन्यावर दबाव आला, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीज विभागाचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले. तथापि, चांदीच्या किमती 3,700 रुपयांनी किंवा 1.42 टक्क्यानी वाढून 2,65,000 रुपये प्रति किलोग्राम (सर्व करांसहित) झाल्या. हेही वाचा – ज्वेलरी शेअर्समध्ये मोठी घसरण, कल्याण ज्वेलर्स 9% कोसळला; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम लेमन मार्केट्स डेस्कचे संशोधन विश्लेषक गौरव गर्ग म्हणाले की, आगामी लग्नसराईच्या काळात स्थिर किरकोळ मागणीचा फायदा झाल्याने चांदीच्या दरात किंचित वाढ दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट सोन्याचा भाव 1 टक्कयांहून अधिक घसरून प्रति औंस 4,661.68 डॉलरवर आला, आणि चांदीचा भावही किंचित घसरून प्रति औंस 80.28 अमेरिकी डॉलरवर होता. हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी सोने खरेदीबाबत सावधगिरीचा इशारा का दिला? रुपया, डॉलर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे संपूर्ण गणित समजून घ्या… एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी विभागाचे उपाध्यक्ष (संशोधन विश्लेषक) जतीन त्रिवेदी म्हणाले, अमेरिका-इराण शांतता प्रस्तावांसंदर्भातील नकारात्मक घडामोडींवर बाजारांनी सावध प्रतिक्रिया दिल्याने सोन्याचा भाव किंचित कमजोर राहिला. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे बाजारांमध्ये पुन्हा एकदा महागाईची चिंता वाढत आहे.