नवी दिल्ली – दिल्ली सराफात शुक्रवारी सोन्याचा दर 50 रुपयांनी वाढून 45,959 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर मात्र 922 रुपयाने कोसळून 59,834 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारातील दरानुसार भारतातील सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. सध्या विविध जागतिक बाजारांमध्ये अस्थिरता असल्यामुळे सोन्याच्या दरात अस्थिरता असल्याचे ते म्हणाले.