नवी दिल्ली – पाच दिवसानंतर रुपयाच्या मूल्यांमध्ये बरीच सुधारणा झाल्यामुळे सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. चांदीचे दर मात्र स्थिर राहिले.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 126 रुपयांनी कमी होऊन 49,960 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 63,939 रुपये प्रति किलो या पातळीवर स्थिर राहिला. सकाळच्या सत्रात रुपयांचा भाव 25 पैश्यांनी वाढला. त्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
मात्र सोन्याचा दर काही प्रमाणात कमी झाला असला तरी युक्रेनमधील संघर्षामुळे आगामी काळामध्ये सोन्याचा दर काही प्रमाणात वाढण्याची शक्यता कायम आहे.