Gold Rates : सोन्याच्या दरात घसरण चालूच; जाणून घ्या आजचा 10gmचा दर

नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घसरण चालूच आहे. त्यामुळे भारतीय बाजारातही सोन्याचे दर गेल्या आठवड्यापासून कमी होत आहेत. दिल्ली सराफात आज सोन्याचा दर 196 रुपयांनी कोसळून 45,952 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 830 रुपयांनी कोसळून 62,715 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात डॉलर बळकट होत असल्यामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत. भारत आपल्या गरजेच्या बहुतांश सोने आयात करीत असल्यामुळे जागतिक बाजारातील दराचा परिणाम भारतीय बाजारातील दरावर होत असतो, असे एचडीएफसी सेक्युरिटीचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
सध्या भारतामध्ये सोन्याचे आणि चांदीचे दर तुलनेने कमी पातळीवर आहेत. त्यामुळे काही गुंतवणूकदार सणासाठी आणि लग्नासाठी सोने खरेदी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्याने बराच कमी परतावा दिला आहे. कारण सोन्यातील गुंतवणूक शेअर बाजाराकडे वळत असल्याचे सांगितले जाते.





