मुंबई -जागतिक बाजारात बुधवारी सोन्याचे दर वाढल्यामुळे भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 587 रुपयांनी वाढून 45,768 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 682 रुपयांनी वाढून 65,468 रुपये प्रति किलो झाला. रुपयाचा दर आज मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे सोन्याचे दर वाढले असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
रुपयाचा दर कोसळल्यानंतर सोन्याची आयात महागात पडते. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,739 डॉलर प्रती औंस तर चांदीचा दर 25.04 डॉलर प्रति औंस या पातळीवर राहिला.
या घटनाक्रम बाबत एचडीएफसी सिक्युरिटी विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की जागतिक वायदे बाजारांमध्ये सोन्याचे दर तुलनेने कमी झाले आहेत. कारण डॉलर वधारत आहे.
मात्र तरीही रुपयाचा दर कोसळल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत. तरीही भारतात सोन्याचे दर तुलनेने कमी पातळीवर आहेत. त्यामुळे काही गुंतवणूकदार खरेदी करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी घेतले.