Gold Price Today: सोने झाले स्वस्त, चांदीचे भाव जैसे थे, खरेदी करण्यापूर्वी ‘येथे’ तपासा लेटेस्ट दर

Gold Price Today: तुम्हाला सणासुदीच्या आधी सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज (गुरुवार 21 सप्टेंबर 2023) रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. मात्र, आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोन्याचे दर 130 रुपयांनी कमी होऊन दहा ग्रॅम सोन्याचा दर 60170 रुपयांवर आहे. तर एक किलो चांदीचा दर 74500 रुपये आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबतची माहिती दिली आहे.
परदेशी बाजारात सोने घसरले –
परदेशी बाजारात सोन्याचा भाव 1,926 अमेरिकी डाॅलर प्रति औंसवर होता, तर चांदीचा भाव 23.19 अमेरिकी डाॅलर प्रति औंसवर होता.
मिस्ड कॉलद्वारे सोन्याचे दर जाणून घेणे खूप सोपे –
तुम्ही घरबसल्या सोन्याचे दर सहज जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता.
देशातील 55 नवीन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग अनिवार्य –
सरकारने सोन्याच्या अनिवार्य हॉलमार्किंगची व्याप्ती वाढवली आहे. सोन्याचे दागिने आणि कलाकृतींच्या अनिवार्य हॉलमार्किंगचा तिसरा टप्पा देशातील 55 जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आला आहे. यामध्ये देशातील 16 राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश समाविष्ट असेल. हॉलमार्किंगचा पहिला टप्पा 23 जून 2021 रोजी सुरू झाला आहे.





