Gold price : सोन्याच्या दरात माफक घट
Updated On:

नवी दिल्ली – जागतिक बाजारातील संकेतानुसार भारतीय बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात माफक घट नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 29 रुपयांनी कमी होऊन 46,903 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा दर 762 रुपयांनी कमी होऊन 68,560 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,805 डॉलर, चांदीचा दर 26.33 डॉलर प्रति डॉलर राहीला.
याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीज विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिकन रोख्यावरील परतावा वाढत आहे. त्याचबरोबर डॉलर वधारत असल्यामुळे सोन्याच्या किमती कमी झाल्या असल्याचे दिसून आले.
लवकरच फेडरल रिझर्व्हचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याचे मोतीलाल ओसवाल वित्तीय सेवा या संस्थेचे उपाध्यक्ष नवनीत दमानिया यांनी सांगितले.





