Gold Price । पाच दिवसांच्या सतत घसरणीनंतर आज सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवली गेली. मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. बुधवारच्या तुलनेत सोन्याचा भाव केवळ १० रुपयांनी वधारला असून, देशातील बहुतांश भागांत तो ९०,४०० रुपयांपेक्षा अधिक दराने विकला जात आहे. दुसरीकडे, चांदीचा दर ९२,९०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे, जो मागील दिवसाच्या तुलनेत १०० रुपयांनी कमी झाले आहे. प्रमुख शहरातील सोन्याचे दर Gold Price । २२ कॅरेट सोन्याचा दर दिल्लीत ८३,०६० रुपये, चेन्नईत ८२,९१० रुपये, मुंबईत ८२,९१० रुपये, कोलकात्यात ८३,०६० रुपये आणि बेंगळुरूत ८२,९१० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा गुरुवारचा नवीन दर दिल्लीत ९०,६०० रुपये, चेन्नईत ९०,४५० रुपये, मुंबईत ९०,४५० रुपये, कोलकात्यात ९०,४५० रुपये आणि बेंगळुरूत ९०,४५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ Gold Price । राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले शुल्क आणि अमेरिका-चीनमधील वाढता व्यापारी तणाव यामुळे गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर पुन्हा वाढू लागले आहेत, ज्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावरही जाणवत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ३१६३ डॉलरवरून ३१०० डॉलरवर खाली आला आहे. भारतात सोन्याच्या किमती रोज बदलतात, ज्यामध्ये कर, आयात शुल्क, जागतिक दर आणि इतर घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. एक दिवस आधी, बुधवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर वाढून ८७,९९८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता. बाजार सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच तो ८८,३९६ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारातही बुधवारी सोन्याच्या वायद्यांची सुरुवात सकारात्मक झाली होती. कॉमेक्सवर सोन्याच्या किमती वाढल्या आणि प्रति औंस सुमारे ३,०२१ डॉलरवर व्यवहार झाला. हेही वाचा पीटर, स्कॉट, हॉवर्ड…! ट्रम्पच्या टॅरिफ धोरणामागील सूत्रधार ; ‘या’ त्रिमूर्तीने जगाला हादरवले