पुणे – पुढच्या टप्प्यातील सुवर्ण रोखे खरेदी दि.11 मेपासून करता येणार आहे. यासाठी सोन्याची किंमत रिझर्व बॅंकेने प्रत्येक ग्रॅमला 4,590 रुपये ठरविली आहे. ग्राहकांना हे सुवर्ण रोखे 15 मेपर्यंत खरेदी करता येतील.
डिजिटल माध्यमातून सुवर्ण रोखे खरेदी करणाऱ्यांना प्रत्येक ग्रॅमला 50 रुपयांची सूट देण्यात येणार असल्याचे रिझर्व बॅंक आणि केंद्र सरकारने ठरवले आहे. या सुवर्ण रोख्यांची मुदत आठ वर्षे असून ग्राहकांना पाच वर्षांनंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. हे सुवर्ण रोखे फक्त भारतातील नागरिक, अविभक्त हिंदू कुटुंब, ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांना खरेदी करता येऊ शकतात.
स्मॉल फायनान्स बॅंक, पेमेंट बॅंक वगळून इतर बॅंकांतून, नियुक्त केलेली पोस्टाची कार्यालये आणि शेअर बाजाराच्या माध्यमातून हे सुवर्ण रोखेखरेदी करता येऊ शकतात.