सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण: सोने ९०,४५० रुपये प्रति १० ग्रॅमवर
Updated On:

नवी दिल्ली – देशात आणि परदेशात मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट चालूच आहे. मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर शंभर रुपयांनी कमी होऊन 90,450 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दरही पाचशे रुपयांनी कमी होऊन एक लाख रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
व्यापार युद्ध चालू असले तरी त्याची परिणामकारकता कमी झाली आहे. त्याचबरोबर रशिया -युक्रेन युद्ध मिटविण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत सोन्याचे दर काही प्रमाणात कमी होत आहेत.मात्र तरीही गुंतवणूकदारांचे परिस्थितीकडे बारीक लक्ष असून काही प्रमाणात तरी सोने खरेदी चालूच राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.





