gold and silver price today । गेल्या कित्येक दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाल्याची पाहायला मिळाली होती. मात्र आज वाढत्या दराला ब्रेक लागलेला पाहायला मिळाला आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमतीत स्थिरता आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. अशात, जर तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असाल तर येथे दर नक्की पहा. सोन्याची किंमत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,३९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,६४० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. चांदीची किंमत चांदी ९५,२१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९६,१७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,२३८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,२६० प्रति १० ग्रॅम आहे. पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,२३८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,२६० रुपये आहे. नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,२३८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,२६० रुपये इतका आहे. नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,२३८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,२६० रुपये आहे.