Gold-Silver Price : मोदी सरकार 2.0 चा शेवटचा अर्थसंकल्प नवीन संसदेत आज म्हणजेच गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सादर करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प असेल, पण या मिनी बजेटमध्येही सरकारकडून अनेक मोठ्या घोषणांची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.
अशात आज देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या चांदीच्या किमतीत बदल दिसून येतोय. सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. जागतीक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारातही सोमवार सोन्या आणि चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,६८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,४८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७२,२९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,५३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,३४७ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,५७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,३४७ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,५७० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,३४७ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,५७० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५७,३४७ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,५७० रुपये आहे.