मुंबई – काही दिवसांपूर्वीच ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बेस्ट ओरिजनल ऑस्करचा पुरस्कार पटकावला आहे. त्यानंतर भारतीय सिनेमाची जगभर चर्चा झाली. आता ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाने देखील मानाचे स्थान मिळवले आहे. नुकताच पार पडलेल्या ‘फिल्मफेअर अवॉर्ड मराठी 2022’ मध्ये ‘गोदावरी’ ने बाजी मारली आहे. ‘गोदावरी’ चित्रपटाला फिल्मफेअरमध्ये ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ म्हणून सन्मानित आले आहे.
अभिनेता जितेंद्र जोशीने पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, ‘गोदावरी चित्रपट पुन्हा जिंकला!! यावेळी फिल्मफेअरमध्ये’. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा, पार्श्वसंगीत, आणि बेस्ट क्रिटिक अवॉर्ड अभिनेता हे पुरस्कार मिळाले आहे. या चित्रपटाला 5 ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाले आहेत.
View this post on Instagram
मागील वर्षी कान्स चित्रपट महोत्सवामध्ये देखील गोदावरीने स्थान मिळवले होते. दरम्यान, गोदावरीकाठच्या शहरात राहणाऱ्या निशिकांत देशमुख या तरुणाची आणि त्याच्या कुटुंबाची कथा ‘गोदावरी’मध्ये मांडण्यात आलीय. यात जितेंद्र जोशी, नीना कुलकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले हे कलाकार आहेत.