Goa Election 2022 | गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या 24 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई – आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या स्टार प्रचारक यादीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार फौजिया खान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, केरळचे वनमंत्री श्री. ए. के. ससिनद्रन, राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष सोनिया दूहन, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, गोवा अध्यक्ष जोसे फिलीप डिसोजा, डॉ. प्रफुल हेडे, अविनाश भोसले, सतिश नारायणी (गोवा), केरळचे अध्यक्ष पी. सी. चोको, केरळचे आमदार थॉमस के. थॉमस आदींचा समावेश आहे.
या स्टार प्रचारकांची यादी पक्षाच्या दिल्ली कार्यालयातून राष्ट्रीय सचिव व कार्यकारिणी सदस्य एस. आर. कोहली यांच्यातर्फे प्रसिद्धीस पाठवण्यात आली.





