पुणे जिल्हा | पंचायत समितीत जायंचे, गटार तुटवड जा

पळसदेव (वार्ताहर) – इंदापूर तालुक्याच्या कारभार हाकणार्या पंचायत समिती कार्यालया समोरच गटारी तुंबले आहे. हे घाण, दुर्गंधीयुक्त पाणी पंचायत समितीच्या गेटसमोर साचून राहिले आहे
त्यामुळे पंचायत समितीत प्रवेश करणार्या नागरिकांना गाव गावच्या लोकप्रतिनिधींना व अधिकार्यांना या गटारीच्या पाण्यातूनच वाट काढत कार्यात प्रवेश करावा लागत असल्याची मोठी शोकांतिका आहे.
पंचायत समितीसमोरच गटारीचे पाणी असल्याने या पाण्यामुळे दुर्गंधी देखील परिसरात पसरली आहे. त्यामुळे गाव खेड्याचा नागरिक आपली कामे घेऊन पंचायत समिती कार्यालयात आल्याबरोबर त्याचे सांडपाण्याच्या डबक्यानेच स्वागत होत आहे.
शिवाय या गटारीच्या पाण्यामुळे बाजूला फळाचे स्टॉल हॉटेल, नाश्त्याचे हॉटेल यांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तरी याबाबत तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे व तालुक्याचे प्रमुख असलेल्या कार्यालयाचीच ही दूर अवस्था असल्याने बाकी विकासाची कामे देखील असेच दुरवस्था होते की काय असा प्रश्न गाव गावातून आलेल्या कार्यकर्त्यांना व नागरिकांना पडला आहे.
तरी तातडीने या सांडपाण्याचा बंदोबस्त करून नागरिकांना होणारा त्रास थांबवा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.




