गो एअरकडून विमान प्रवाशांना भरमसाठ सवलती

मुंबई – गो एअर या नागरी विमान वाहतूक कंपनीने जवळजवळ दहा लाख इतकी तिकिटे सवलतीच्या दरात प्रवाशांना उपलब्ध केली आहेत. या तिकिटाचे दर देशांतर्गत प्रवासासाठी 899 रुपयांपासून सुरू होत आहेत. 27 मे पासून तीन दिवस प्रवाशांना या तिकिटाचे बुकिंग करता येणार आहे. या काळात बुकिंग केलेल्या प्रवाशांना 15 जून ते 31 डिसेंबर या काळात प्रवास करता येणार आहे.
प्रवाशांना तारीख, वेळ ठरविण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवास महागला असल्याचे बोलले जात असतानाच आम्ही प्रवाशासाठी ही मोठी संधी देऊ केली असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नेस वाडिया यांनी सांगितले. मुळती तिकिटातील सवलतीशिवाय तर बऱ्याच सवलती जाहीर केल्या असल्याचे वाडिया यांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. यामुळे प्रवाशांची निष्ठा मिळविण्यात आम्हाला यश मिळेल, असे ते म्हणाले.





