कोपेनहेगन – आधुनिक जगाला सतावणाऱ्या ग्लोबल वार्मिंगचे विविध दुष्परिणाम समोर येत आहेत आता एका नवीन संशोधनाप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगचा आणि माणसाच्या दैनंदिन निद्रेचा थेट संबंध असून ग्लोबल वॉर्मिंगमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या झोपेचे वार्षिक 46 तास कमी होत आहेत डेन्मार्क मधील कोपेनहेगन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबत संशोधन केले असून त्याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जगभरातील 68 देशांमध्ये याबाबतचे संशोधन करण्यात आल्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग आणि निद्रा याचा थेट संबंध असल्याचे लक्षात आले ग्लोबल वार्मिंग मुळेच माणसाच्या झोपेचे तासही कमी होऊ लागले आहेत 68 देशातील 47 हजार लोकांवर प्रयोग केल्यानंतर हे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत झोपेचे तास कमी होण्याचे हे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत मध्ये महिलांमध्ये जास्त आहे.
तसेच 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या मध्येही हे प्रमाण जास्त आहे कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ही सर्वसामान्य नागरिकांचे झोपेचे तास कमी होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढत असून दरवर्षी उन्हाच्या लाटा येण्याचे प्रमाणही वाढत आहे त्याचा परिणाम लोकांच्या झोपेवर होतो तापमान 25 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाले तर 46000 पेक्षा जास्त लोकांच्या झोपेचे प्रमाण कमी होते.