Laxman Hake | राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर याला ओबीसी समाजाकडून विरोध होत आहे. तर दुसरीकडे हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजानं आमचा समावेश हा एसटी प्रवर्गात करावा, अशी मागणी केली आहे. तर बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध होत आहे. याशिवाय जालन्यात धनगर समाजाचं देखील आंदोलन सुरू झालं आहे. धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी आहे. ‘नाभिक, धोबी समाजाला एससीमधून आरक्षण द्या’ सध्या राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे, नाभिक, धोबी समाजाला एससीमधून आरक्षण द्या, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. बलुत्या-आलुत्यामधील आमचा नाभिक समाज असेल, धोबी समाज असेल, बलुत्या-आलुत्या वाल्यांना एससी आरक्षण मिळावे, कारण देशातील अनेक राज्यांमध्ये ते एससीमध्ये येतात. जर कोणी एससी, एसटीमध्ये देणार असतील तर आम्हाला आनंद आहे, असं हाके यांनी म्हटलं आहे. Laxman Hake | पँथर सेना आक्रमक दरम्यान, हाकेंच्या या मागणीमुळे पँथर सेना आक्रमक झाली असून संघटनेकडून त्यांना इशारा देण्यात आला आहे. लक्ष्मण हाके यांनी एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं पाहू नये, वाकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे काढून हातात देऊ, असा इशारा पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला आहे. लक्ष्मण हाके यांच्या या मागणीनंतर आता आरक्षणाचा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. Laxman Hake | हेही वाचा: Koyna Dam Protest | कोयना धरणग्रस्तांचा संताप उफाळला! २ ऑक्टोबरला ‘जलसमाधी’ आंदोलनाचा इशारा