बँकेचे हप्ते भरण्यास सवलत द्या !

भाजप नेते दादासाहेब सातव यांची मागणी

वाघोली : सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊनचा कालावधी आहे. हा कालावधी राज्य सरकारकडून वेळोवेळी वाढवण्यात देखील येत आहे. याच काळात लहान-मोठ्या उद्योगांमध्ये गुंतवणूक केलेल्या कामगार, कारखानदार यांनी  व्यवसायाच्या उभारणीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यास मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे आहे.  केंद्र व राज्य शासनाने बँकांची हप्ते भरण्यास नागरिकांना सवलत देण्याची मागणी पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांनी केली आहे.

दादासाहेब सातव पाटील यांनी सांगितले की, लघुउद्योगामध्ये कच्च्या मालापासून ते उद्योग सामग्री पर्यंत अनेक जणांनी गुंतवणुकीसाठी उभारण्यात आलेला पैसा हा पतसंस्था, सहकारी बँका, तसेच इतर राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज रूपाने उभा केला आहे. या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये या कर्जांचे हप्ते नागरिकांना भरावे लागत आहे. या हप्त्यांमध्ये अथवा त्याच्या व्याजाने मध्ये जरी सवलत केंद्र अथवा राज्य सरकारच्या पातळीवर मिळाल्या तर नागरिकांना त्यातून एक मोठा दिलासा मिळेल यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सातव पाटील यांनी सांगितले आहे.

वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याबरोबर नागरिकांची आर्थिक पत सांभाळणे देखील गरजेचे असल्याने तूर्तास तरी बँकांच्या हप्ते वसुली अथवा  तसेच कर्जाची देणी यापासून काही कालावधीकरीता नागरिकांना सवलत मिळावी अशी मागणी दादासाहेब सातव पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाकडे केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.