पुणे- सोनिया गांधी यांच्या वाढदिवासानिमित्त क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान व मुक्ता फाउंडेशन यांच्या वतीने बापूसाहेब पवार कन्या शाळा, भवानी पेठ, पुणे येथे इयत्ता दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षितांचा संच वाटप करण्यात आले. या प्रसंगी रमेश बागवे यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले की, सध्या विद्यार्थ्यांचा मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर हा फक्त शिक्षणासाठीच करावा. तसेच मुलीनी शिक्षणासोबतच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. त्यासाठी आम्ही जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम भवानी पेठ, पुणे या ठिकाणी कराटे व बॉक्सिंग प्रशिक्षण मागील अनेक वर्षापासून देत आहोत व आपल्या शाळेतील मुलींना खेळाचे प्रशिक्षण घ्यायचे असेल तर त्यांनी यावे आम्ही त्यांना मोफत प्रशिक्षण देऊ असे भाषण केले. या कार्यक्रमासाठी रमेश बागवे, अविनाश बागवे, इंदिरा बागवे, विठ्ठल थोरात, अरुण गायकवाड, सुनील बावकर, दयानंद अडागळे, जयदीप शेलार, हुसेन शेख, मारुती कसबे, आदित्य गायकवाड उपस्थिती होते.