#लोकसभा2019 : गिरिराज सिंह यांचा प्रचार सुरू

पाटणा –  बिहारमधील बेगूसराय लोकसभा मतदारसंघात भाजपने गिरिराज सिंह यांना उमेदवारी दिली आहे. पण गिरिराज या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याची चर्चा होती. मात्र, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गिरिराज बेगूसरायमधून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर सिंह यांनी आपला प्रचार सुरू केला आहे.

गिरिराज यांचे म्हणणे ऐकून घेतले असून पक्षसंघटना त्यांच्या सर्व समस्यांवर तोडगा काढणार आहे. गिरिराज हे नवादा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते याच मतदारसंघातून विजयी झाले होते. पण आघाडी अंतर्गत भाजपने हा मतदारसंघ लोजपला प्रदान केला आहे. भूमिहार बहुल असलेल्या या मतदारसंघात भाकपने जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याला उतरविले आहे. मला न विचारता मतदारसंघ बदलण्यात आला. बिहारमध्ये कुठल्याच खासदार किंवा मंत्र्याचा मतदारसंघ बदलण्यात आलेला नाही, पण माझ्यासोबत असे घडल्याने दुःखी असल्याचे म्हणत गिरिराज यांनी नाराजी जाहीर केली होती. मात्र आता त्यानी प्रचार सुरू केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.